testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कर्जमाफीमुळे मी समाधानी नाही : उद्धव ठाकरे

uddhav thackeray
शेतकऱ्यांची एकजूट आणि शिवसेनेचा रेटा यामुळेच सरकारला कर्जमाफी घ्यावी लागली असे सांगत झालेल्या कर्जमाफीमुळे मी समाधानी नाही परंतु किमान सुरवात तर झाली याचे आपण स्वागत करतो. मात्र नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे कोणीही कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही यासाठी एक समिती बनवून सरकारला सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायला भाग पाडु आणि आंदोलन काळात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हेही मागे घायला भाग पाडू
असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.
मात्र सरकारने याला प्रतिसाद दिला नाही तर सरकारचे काय करायचे ते मी पाहतो असा सज्जड इशाराही
दिला. उद्धव ठाकरे संवाद यात्रेला रविवारी निफाड तालुक्यातून सुरुवात झाली. त्यावेळी बोलत होते.


यावर अधिक वाचा :