शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2017 (12:12 IST)

यूपीएचा कट, भागवतांचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश ?

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच खळबळजनक माहिती समोर आल्यामुळे विरोधी पक्ष ‘बॅकफूट’वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एका इंग्रजी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारकडून त्यांच्या अखेरच्या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याचा प्रयत्न सुरू होता. ‘हिंदू दहशतवादा’च्या जाळ्यात त्यांना अडकवण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधील काही मंत्र्यांचा प्रयत्न होता, असे या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांना आयतीच संधी प्राप्त झाली आहे.

अजमेर आणि मालेगाव बॉम्बस्फोटानंतर यूपीए सरकारने यामागे ‘हिंदू दहशतवाद थिअरी’ मांडली होती. या अंतर्गतच मोहन भागवत यांना अडकवले जाणार होते. यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) बड्या अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात येत होता, असे या वृत्तात म्हटले आहे.