Widgets Magazine
Widgets Magazine

अकरावीची प्रवेश प्रक्रिया निश्चितच वेळेत होतील- विनोद तावडे

मंगळवार, 20 जून 2017 (17:42 IST)

दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशातील काही घोळ असतील तर ते बुधवारपर्यंत दूर करण्यात येतील आणि गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधीचा घोळ मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते.अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे. गणिताला पर्यायी विषयच ठेवणार, असंही विनोद तावडेंनी स्पष्ट केलं आहे. गणिताला पर्यायी विषय ठेवण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं आश्वासनंही तावडेंनी दिलं आहे. सर्व्हर स्लो झाल्यामुळे अनेकांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. उद्या एक दिवस पूर्ण घेऊन सर्व प्रकारच्या सुधारणा करण्यास दिला आहे आणि टेक्निकल एक्सपर्ट घेऊन मी स्वतः तपासणी करणार असंही विनोद तावडे म्हणाले.दहावीच्या निकालानंतर सर्व विभागात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावतीमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

०३ तास सलगपणे योग करत विश्वविक्रम लाँगेस्ट योगा मॅरेथॉन – फिमेल

नाशिकमधल्या योग शिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सलगतब्बल १०३ तास सलगपणे योग करत विश्वविक्रम ...

news

जपानच्या कंपन्यांमध्ये 3 दिवसांचच आठवडा

टोकियो- जपानमधील अनेक कंपन्यांनी आठवड्यात तीन दिवस काम करण्याचे धोरण लागू केले आहे. कमी ...

news

सोबत मृत्यू यावा म्हणून तो पत्नीला चावला

बिहारच्या समस्तीपूरमध्ये वेगळीच घटना घडली आहे. गावात विषारी सापाने एका पतीला चावा घेतला व ...

news

आईने टीव्ही बघू दिला नाही, मुलाने केली आत्महत्या

नोएडातील सदरपूरमध्ये आईने टीव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या ओम (10) ने ...

Widgets Magazine