testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दुष्काळी लातूरला मोठा दिलासा, या धरणाचे मिळणार पाणी

ujani dam
जलाग्रही लातूर या सर्वसामान्य लातूरकरांच्या चळवळीस यश मिळत असून, लातूरला उजनीचे पाणी मंजूर करण्यात आले. लातूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी या घटनेची नोंद करण्यात येणार आहे.

औरंगाबाद येथे आयोजित मराठवाडा टंचाई आढावा बैठकीत याबाबतची घोषणा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली असून, त्याबद्दल
दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबाद येथे मराठवाडा टंचाई आढावा बैठकीच्या निमित्ताने आलेल्या पाणीपुरवठा मंत्री यांची जलाग्रही लातूरच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि उजनीचे पाणी लातूरला मिळावे याचे निवेदन दिले सोबत पाण्याच्या गंभीर स्थितीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी लातूर चे खासदार सुधाकर शृंगारेही उपस्थित होते. यापूर्वी जलाग्रही लातूरच्या वतीने देशाचे पंतप्रधान, जलशक्तीं मंत्री, मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

जलाग्रही लातूर या अराजकीय उपक्रमांद्वारे सर्व सामान्य लातूरकरांनी लक्षवेधी लढा उभारला होता. मिस्ड कॉल अभियानांतर्गत ४३००० पेक्षा अधिक लातूरकर या उपक्रमात सहभागी होत उजानीचे पाणी मिळावे यासाठी आग्रही झालेले होते. लातूरला उजनी पाणी बंद पाईपलाईनद्वारे मांजरा धनेगाव धरणास जोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या कामासाठी ३६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुढील ०६ महिन्याच्या
प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे.
उजनी येथील
पाणी लातूरला देताना सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया आणि तरतूद पूर्ण करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही पाणी पुरवठा मंत्री यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य लातूरकरांच्या एकत्रित प्रयत्नांना यश येवून लातूर ची अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी मान्य करवून घेतल्याबद्दल जलाग्रही लातूरच्या वतीने लातूरकरांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले असे ‘जलाग्रही’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बजेटशी निगडित हे 10 रोचक तथ्य जे तुम्हाला माहीत आहे का

national news
बजेटशी निगडित काही महत्त्वाचे रोचक तथ्य ...

... आता 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश काढाल तर द्यावा लागेल ...

national news
जर तुम्ही 1 वर्षात 10 लाखापेक्षा जास्त कॅश काढाल तर यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार ...

Budget 2019: CNG गाड्यांवर कमी होऊ शकतो GST

national news
भारतात ऑटो सेक्टरची सर्वात मोठी कंपनी मारुतीला या बजेटमध्ये सरकारकडून अपेक्षा आहे की ...

नोकरी करणार्‍यांना मिळू शकतो मोठा दिलासा, इन्कम टॅक्समध्ये ...

national news
Budget 2019: केंद्राची मोदी सरकार 5 जुलै रोजी आपल्या दुसर्‍या कार्यकाळाचे पहिले बजेट सादर ...

पेटीएम, गुगल पे, भीम अॅप वरून फसवणूक, सावध राहा

national news
क्रेडिट आणि डेबिट कार्ड नंबर आणि कार्ड वेरिफेकेशन वॅल्यू (सीव्हीव्ही) आणि वन टाइम पासवर्ड ...