गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2017 (11:33 IST)

स्वभिमानीने चुकीने ओतले १० हजार लिटर दूध

आंदोलन करण्याची घाई आणि शेतकरी संप याचा मोठा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पडला आहे. त्यांच्या उतविल्तेमुळे सुमारे १० हजार लिटर दूध वाया गेले आहे. यामध्ये  चैतन्य मिल्कवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करून संतप्त कार्यकर्त्यांनी तेथील तब्बल 10 हजार लीटर दूध ओतून दिले आहे. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे त्यांना कळले.

मात्र, ते दूध यापूर्वीच संकलित केल्याचे लक्षात आल्यानंतर आंदोलन मागे घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनी चैतन्य मिल्क कंपनीचे अध्यक्ष गणेशराव भांड यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तशी दिलगिरी व्यक्त्त करणारे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनी गणेशराव भांड यांना दिल्याने आंदोलनावर पडदा पडला आहे. मात्र अश्या प्रकारे जर आंदोलन होतील आणि जे नुकसान होणार आहे त्याला जबादार कोण राहणार.