शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 मार्च 2017 (00:35 IST)

महिला दिवस : महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम

महिलांनी जास्तीतजास्त लोकशाही प्रक्रियात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला जात आहे. यात आत्ता पर्यंत मतदार नोंदणी न केलेल्या महिलांनी जवळच्या तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय अथवा विधानसभा मतदारसंघ कार्यालयात जावून नवीन मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरून सदर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्जासोबत अलिकडच्या काळातील दोन छायाचित्र, आधार कार्डाची छायांकीत प्रत, रहिवासी पुरावा म्हणून छायांकीत प्रत  आणि अठरा वर्ष पुर्ण झाल्याबाबत पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माच्या दाखल्याची छायांकीत प्रत जोडावी लागणार आहे.
या उपक्रमादरम्याण उपलब्ध अर्ज आणि सुविधा
 
अर्ज नमुना क्र.६ : नवीन मतदार नोंदणी, सोबत अलिकडच्या काळातील दोन छायाचित्र, आधार कार्डाची छायांकीत प्रत, रहिवासी पुरावा म्हणून छायांकीत प्रत  आणि अठरा वर्ष पुर्ण झाल्याबाबत पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माच्या दाखल्याची छायांकीत प्रत
 
अर्ज नमुना क्र. ७ : विवाह झालेल्या महिलांनी मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी, सोबत विवाह प्रमाणपत्राची छायांकीत प्रत सादर करावी.
 
अर्ज नमुना क्र. ८ : विवाह झाल्याने महिला मतदाराचे यादीतील नाव बदलण्यासाठी, सोबत विवाह प्रमाणपत्राची छायांकीत प्रत सादर करावी.
 
अर्ज नमुना क्र. ८ अ : विवाह झाल्याने मतदारसंघांतर्गत पत्ता बदलण्यासाठी, सोबत विवाह प्रमाणपत्र आणि नवीन पत्त्याच्या रहिवास पुराव्याची छायांकीत प्रत सादर करावी.
 
सदर विशेष नोंदणी कार्यक्रम १० मार्च २०१७ पर्यंत रोज कार्यालयीन वेलेल्त म्हणजेच सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत राबविण्यात येईल. महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी केले आहे.