गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (14:45 IST)

अकबरुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुसलमिन (एमआयएम) पक्षाचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्‍यात आला. अग्रीपाडा भागात विनापरवानगी रॅली काढल्याच ओवेसींवर आरोप आहे. अकबरुद्दीन ओवेसी हे प्रक्षोभक भाषण करणारे नेते म्हणून ओळखले जातात.  
 
तेंलगणमधील एमआयएम पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरला आहे. या पार्श्वभूमीवर ओवेसी हे मुंबईत तळ ठोकून आहेत. भिवंडी आणि नागपाडा भागात ओवेसींनी सभा घेतल्या. विशेष म्हणजे  ओवेसी यांचा मुक्काम सध्या नागपाडा परिसरातच आहे. शुक्रवारी आवेसी अरब मशिदीमध्ये नमाज अदा करकेल्यानंतर भव्य रॅलीही काढली. 
 
रॅलीत ओवेसीसोबत तीनशे पेक्षा अधिक कार्यकर्ते होते. त्यामुळे वाहतूक कोलमड्याचे अग्रीपाडा पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ओवेसी यांच्यावर मुंबई पोलिस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
परंतु ओवेसी यांनी पोलिसांचा आरोप फेटाळून लावला आहे. आम्ही रॅली काढली नसून कार्यकर्ते आम्हाला  भेटायला आल्याचे ओवेसींनी म्हटले आहे.