शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :कोल्हापूर , शनिवार, 24 जानेवारी 2015 (11:57 IST)

अच्छे दिन केवळ मोदींमुळेच : रामदेवबाबा

मोदी योगी, बाकीचे भोगी

‘सध्या रावण आणि कंस यांच्यासारखे अत्याचार होत नाहीत. जे थोडेफार पाप होते, ते देखील संपले. कारण आतापर्यंतचे सर्व पंतप्रधान हे केवळ ‘भोगी’ होते, मात्र नरेंद्र मोदी ‘योगी’ आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने अच्छे दिन निर्माण होत असल्याची मुक्ताफळे  योगगुरू रामदेवबाबा यांनी उधळली.
 
कणेरी मठ येथे आयोजित भारतीय संस्कृती उत्सवात ‘युवा ज्ञानोत्सव’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर होते. रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘सध्याचा युवक आपल्यापुढे आदर्श नाही, असे सांगत असतो. पण, राम, कृष्ण, अर्जुन, विवेकानंद हे सर्व तरुण होते. त्यांनी अत्याचारी राक्षसांचा नाश केला. त्यांचा आदर्श समोर असताना असा विचार मनात येतोच कसा. छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद, भगतसिंग यांची चित्रे घरात लावा. केवळ इतिहासातूनच प्रेरणा घेण्यापेक्षा स्वत: वेगळा इतिहास निर्माण करा. आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म हा नशिबाने मिळालेला आहे. त्यामुळे जे काही प्राणपणाने करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा.’
 
डॉ. विजय भटकर म्हणाले, ‘संस्कृती रक्षणासाठी भारताला विश्वगुरू बनलेच पाहिजे. संस्कृती ही फार मोठी गुंतवणूक आहे, त्याचा विचार करता शिक्षणातून पूर्ण संस्कृती मिळत नाही त्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी असे महोत्सव झाले पाहिजेत. भारतीय संस्कृती विचार हा वैश्विक आहे. गुरूपरंपरा, मातृभकक्ती याचा आदर सर्वाना समजला पाहिजे.’
 
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांनी देवाने एकच माणूस निर्माण केलेला असताना देशांनी सीमा का केल्या असा मुद्दा उपस्थित केला. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, खुलेआम अंमली पदार्थाची देवाणघेवाण सुरू असते.