शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अणेंकडून वेगळ्या विदर्भाचा नकाशा, झेंडाही

नागपूर :  केकमधून विदर्भाच्या तुकडा कापणाऱ्या श्रीहरी अणेंनी आता वेगळ्या विदर्भाचा नकाशा आणि झेंडाही तयार केला आहे. केसरी, हिरवा, काळा, निळा, पांढरा आणि अखेरीस पट्टेरी वाघाचा रंग असे एकूण सहा रंग या झेंड्याला आहेत.
 
प्रत्येक जिल्ह्याला नकाशात वेगवेगळ्या रंगात दाखवलं गेलं आहे. आज आगामी महाराष्ट्र दिनाच्या पाश्वभूमीवर श्रीहरी अणे आणि विदर्भवाद्यांनी नागपुरात बैठक घेतली. केसरी रंग संत्र्याचा, पांढरा रंग कापसाचा, हिरवा रंग वनाचा, निळा रंग खनिज आणि विजेचा, काळा रंग कोळशाचा, तर अखेरीस पट्टेरी वाघांचा रंग आहे.