गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नाशिक , मंगळवार, 29 जुलै 2014 (17:44 IST)

अतिक्रमण काढा अन्यथा नाशिकचा कुंभमेळा रद्द?

नाशिक येथे जानेवारी 2015 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले आहे. मात्र, कुंभमेळा परिसरातील अतिक्रमण तातडीने काढले नाही तर कुंभमेळा रद्द करु, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांनी दिला आहे. महंत ग्यानदास महाराजांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यांनी कुंभमेळा परिसरातील पाहाणी केली. परंतु या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 
 
ग्यानदास महाराज म्हणाले, यापूर्वीही नाशिकमध्ये कुंभमेळा झाला होता. मात्र तेव्हा इतक्या प्रमाणात अतिक्रमण झालेले नव्हते. गेल्या कुंभमेळ्यात दीडशे महंत आले होता. आता सातशे महंत नाशिकात दाखल होणार आहेत. त्यामुळे यंदा जास्त जागा अपेक्षित आहे. मात्र, कुंभमेळ्याच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने कुंभमेळा रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.