गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 1 जुलै 2015 (11:11 IST)

... अन्यथा महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस

महाराष्ट्रात  पावसाने ओढ दिल्याने शेतीवर संकट आले असून बळीराजा धास्तावला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप हंगामदेखील धोक्यात आल्यामुळे या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा शासनाचा विचार सुरु असल्याचे कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. परंतु मराठवाड्यातील पाच-सहा जिल्ह्णांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, येथे कृत्रीम पावसासाठी शासन विचार करत आहे. याबाबत शासनस्तराव बैठका सुरु असून, काही संस्था यासाठी पुढे आल्याची माहिती त्यांनी दिली.