शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Updated :मुंबई , सोमवार, 28 जुलै 2014 (11:39 IST)

अमिताभ मराठमोळ्या वेशात

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांनी महाराष्ट्र फलोत्पादन विभागाच्या ब्रँड अँम्बेसेडरपदाची जबाबदारी स्वीकारली. बिग बी यांनी स्वत: 'ट्विट'करून ही माहिती दिली.  बिग बी यांनी केशरी रंगाचा फेटा व नेहरू शर्ट अशा मराठमोळ्या लूकमध्ये आपले छायाचित्रही ट्विट केले आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत अमिताभ यांच्याकडे ब्रँड अँम्बेसेडरपदाचा प्रस्तावही पाठविला होता. अमिताभ यांनीही सुरुवातीला या प्रस्तावाला होकार दिला. मात्र, त्यानंतर यावर कार्यवाही सुरु झालेली नाही. 
 
द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन व निर्यात यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आंबा, कांदा, केळी, अंजीर, सीताफळ व स्ट्रॉबेरी उत्पादनात राज्य अग्रेसर आहे. त्यामुळे विभागाच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी काम करताना अतिशय आनंद होत असल्याचे बिग बि यांनी सांगितले.