शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (10:59 IST)

अरुण गवळीचा जामिन अर्ज फेटाळला

कुख्यात गुंड अरुण गवळीची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आईची तब्येत ठीक नसल्याने तिला भावनिक आधार मिळावा, यासाठी त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता.
 
मात्र, गवळीच्या गुन्ह्णाचे गांभीर्य पाहता आणि समाजाचे हित पाहता, त्याला जामिनावर सोडणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळला.