गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अरुण दातेंच्या मुलावर भिकार्‍याचं जीणं!

पुणे : संगीतकार अरुण दाते यांचे नाव घेताच सुमधूर भावगीत कानात साद घालू लागते पण, त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात हे गीत बेसूर झाले आहे. त्यांचा पोटचा मुलगाच भिकार्‍चं जीणं जगतं असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. त्यांचे नाव आहे संगीत दाते.
 
संगीत हे आपल्या कामानिमित्त ते आठ दिवसांपूर्वीच पुण्यात आले होते. त्यांनी बरोबर आणलेलं साहित्य अज्ञातांनी लुटलं. यावेळी त्यांना दुखापत झाली. विशेष म्हणजे रुग्णालयातूनही त्यांना थारा मिळाला नाही. अखेर विमनस्क स्थितीत त्यांनी फ्लायओव्हरखाली आसरा घेतला. याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी संगीत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
 
दरम्यान, माझ्या या अवस्थेला माझे कुटूंबच कारणीभूत असल्याचा दावा संगीत यांनी केल्याचे समजते.  माझा भाऊ हाच मला वडिल आणि कुटूंबाशी संपर्क करु देत नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते.
दरम्यान, त्यांचे भाऊ अतुल दाते यांनी या आरोपांचा इन्कार केला असल्याचे समजते. संगीत हे दारु पिऊन सर्वांना त्रास द्यायचे. पत्नीलाही मारहाण करायचे. त्यामुळे कायदेशीर नोटीस देऊन त्यांना बेदखल करण्यात आले असल्याचा खुलासा त्यांनी केल्याचे समजते.