गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

आज राज्यातील व्यापार बंद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडकडीत बंदमध्ये गेले असतानाच आज सोमवारी आणकी एका बंदला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापारी महासंघाने राज्यभरातील व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापारी महासंघात 750 व्यापारी संघटनांचा समावेश असन सोमवारी त्यांनी श्रदांजली दिवस पाळण्याचे ठरवले आहे. त्यात सुमारे 35 हजार व्यापारी सहभागी होतील. मुंबईतील रिटेल व्यापारही बंद राहणार असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारातील व्यापारही होणार नाही.

माथाडी संघटनेनेही या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. या श्रद्धांजलीत सहभागी होण्याचे आवाहन फॅमचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी केले आहे. राज्यातील घाऊक व किरकोळ व्यापार्‍यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

गुरनानी यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुखांच्य निधनाने व्यापार्‍यांच्या मदतीला सतत धावून येणारा सच्चा मित्र गमावला आहे.

शिवसेनेचा नकार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे काही व्यापारी व वहातूक संघटनांनी सोमवारी बंद जाहीर केला असला तरी हा बंद शिवसेनाचा नाही व या बंदला शिवसेनेचा पाठींबाही नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊन यांनी स्पष्ट केले आहे.