शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पंढरपूर , बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (11:18 IST)

आजपासून उजनीतून पाणी सोडणार

कार्तिकी यात्रा तसेच सोलापूर शहरासाठी बुधवार, 29 पासून उजनी धरणातून चंद्रभागेत 4 टी.एम.सी. पाणी सोडण्यात   येणार आहे.
 
यंदा समाधानकारक पाऊस झाला नसला तरी उजनी धरण काठोकाठ भरले आहे. मात्र, मागील दीड महिनपासून विधानसभा निवडणुकीच वातावरणामुळे पाणी सोडणची मागणी शेतकरी वर्गातून झाली नाही. आता पिणसह शेतीसाठी पाणी सोडणची मागणी होत आहे. नूतन सरकार अद्याप स्थापन झाले नसले तरी नियोजित पाळीचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून धरणापासून पंढरपूर व सोलापूर शहरापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी सर्व बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून हा विर्सग सोडण्यात येणार असून तीन दिवसांनी हे पाणी पंढरीत दाखल होईल.
 
दरम्यान, नदी बरोबरच कॅनॉलमध्ये देखील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी थकबाकी भरून पाणी मागणीचे अर्ज शेतकर्‍यांनी करावेत असे आवाहन उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभिंता अजय दाभाडे यांनी केले आहे.