शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 5 मे 2014 (10:38 IST)

आदित्य ठाकरे मीडियावर भडकले

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखाचा चुकीचा अनुवाद करून त्याचा विपर्यास केल्याचे परखड मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून व्यक्त केले आहे. तसेच यासाठी त्यांनी मीडियाला जबाबदार धरले आहे. विशेष म्हणजे आदित्य यांनी मीडियाला दोषी ठरवले आहे.

'सामना'तून प्रसिद्ध कऱण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा जन्मोत्सव, कोण कोण सामील होणार’ या अग्रलेखाचा वापर करून काही जणांनी मराठी गुजराती बांधवांमध्ये गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपी त्यांनी केला आहे. महाराष्ट्र दिनी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात मुंबईतील गुजराती बांधवांवर टीका करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात गुजराती बांधव सहभागी होत नाहीत. तसेच गुजराती मराठी बांधवांसह परकेपणाने वागत असल्याची टीका या अग्रलेखात करण्यात आली होती. मात्र, चौहूबाजुंनी टीका होत असल्याने आता अदित्या ठाकरेंनी या सर्व प्रकाराचे खापर मीडियावर फोडले आहे.