बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (11:18 IST)

आधी बिअरचे पाणी थांबवा : राजू शेट्टी

बिअरसाठी देण्यात येणारे पाणी आधी थांबवा, त्यानंतर साखर कारखान्यांचे गाळप बंद करण्याची भाषा करा, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला लगावला आहे.
 
कारखान्यांना धरणातून पाणी देणार नाही, त्यांचे गाळप थांबविण्यात येईल, असे राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. याबाबत शेट्टी म्हणाले, एक लिटर बिअरसाठी ६७ लिटर पाणी लागते. त्यापेक्षा कमी पाणी साखर निर्मितीला लागते. आता ऊसाचे पिक आले असल्याने ऊसासाठी जादा पाणी जात असल्याच्या आरोपात तथ्य नाही. त्यामुळे आधी बिअर निर्मितीसाठी सुरु असणारा पाण्याचा वापर थांबवा त्यानंतर साखर कारखान्यांचे थांबवावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.