गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 20 ऑक्टोबर 2014 (12:30 IST)

आमचा शत्रू काँग्रेसच, शिवसेना नव्हे : फडणवीस

शिवसेना हा भाजपचा कधीच शत्रू नव्हता. आमचा खरा शत्रू आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादी, असे सांगत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना यांच्यात पुन्हा युती होऊ शकते असा संकेत दिला.
 
विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल इतक्या जागा त्यांना मिळालेल्या नाहीत या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या या वक्तव्याला खूपच महत्त्व दिले जात आहे.

शिवसेनेबरोबर जुळवून घेण्याचा संकेत फडणवीस यांनी दिला असला तरी स्पष्ट बहुमत न मिळाल्यास भाजपची नेमकी कोणती भूमिका राहणार? या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली नाही.