गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (09:24 IST)

आयोजक नसले तरी गोविंदा रचणार थर

दहीहंडीत गोविंदांवर लादलेल्या जाचक अटींबाबत संभ्रमावस्था कायम असल्याने आक्रमक झालेल्या गोविंदांनी गोकुळाष्टमीदिवशी रस्त्यावर उतरून थर लावण्याची घोषणा केली आहे. आयोजक नसले तरी गोविंदा थर रचतीलच, असा इशारा देण्यात आला आहे. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणताही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या गोविंदांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने आयोजकांवर बंधने लादण्याचा प्रयत्न सुरु केल्याने आयोजकांविना उत्सव साजरे करणे कठीण असले तरी जे आयोजक उत्सवाचे आयोजन करणार नाहीत, त्यांच्याशिवाय गोविंदा पथके थर रचतील, असे समितीने ठरविले आहे.