मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (10:30 IST)

इंद्राणीची प्रकृती स्थिर तरी चिंताजनक

मुंबई- शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य संशयित इंद्राणी मुखर्जीची प्रकृती सध्या स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचे जे. जे. रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तिला बेशुद्धावस्थेत शुक्रवारी दुपारी जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 
 
इंद्राणीने अधिक गोळ्यांचे सेवन केल्याची शक्‍यता आहे. तिची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर आहे, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी दिली.  मुलीच्या हत्येप्रकरणी 25 ऑगस्टला इंद्राणीला अटक झाली आहे.