शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: उस्मानाबाद , सोमवार, 22 डिसेंबर 2014 (10:38 IST)

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली. 20 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 64 झाली आहे. त्यापैकी 16 शेतकर्‍यांच्या कुटुंबांना शासकीय मदत मिळाली आहे.
 
रूई (ता. परांडा) येथील शेतकरी नवनाथ लिमकर (वय 65) याने बुधवार, 17 डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नागराळ (ता. लोहारा) येथील युवा शेतकरी रवी राजेंद्र गोरे (व 22) याने नापिकी व कर्जबाजारपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळङ्खास घेऊन आत्महत्या केली. जानेवारी 2014 ते 20 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील 64 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतरही आत्महत्याचे हे सत्र सुरूच आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात 2014 मध्ये 20 डिसेंबरपर्यंत झालेल्या 64 आतमहत्यांपैकी केवळ 16 आत्महत्या शासकीय अर्थसहाय्यास पात्र ठरल्या आहेत. 13 आत्महत्यांचे प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.