शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2016 (11:06 IST)

ए रताळ्या, आरं उठ की, तुला कितींदा सांगितलं उघड्यावर बसू नको - आर्ची

सिन्नर नगरपालिकेचे 'सैराट' गुड मॉर्निंगउघड्यावर शौचविधी करणार्‍या महाभागांना आर्चीच्या संवादाला सामोरे जाणारा आहोत.
 
सिन्नरमध्ये  नगरपालिकेने पुढाकार घेतला असून, शहर- परिसरात उघड्यावर शौचास बसणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी 'सैराट'फेम रिंकू राजगुरू अर्थात आर्चीच्या संवादाचे फलक लावण्यात सुरु केले आहे.
 
उघड्यावर शौचाला जाणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे शहरात लोकांचे प्रबोधन करण्यासाठी वर्षभरापासून नगरपालिकेने गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून पदाधिकारी व अधिकारी, कर्मचार्‍यांनी शहर परिसरात उघड्यावर शौचविधी करणार्‍यांना गुलाबपुष्प देऊन 'गुड मार्निंग' करत जनजागृती केली. त्यात फारसे यश मिळत नसल्याने नगरपालिकेने ठिकठिकाणी डिजिटल फलक लावत 'सैराट' चित्रपटातील आर्चीच्या संवादाचा खुबीने वापर करून घेतला आहे.
 
गुड मॉर्निंग पथकांनी शहरातील परिसरात भेटी देऊन उघड्यावर शौचविधी करणार्‍या नागरिकांचे प्रबोधन केले. मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक आदींच्या पथकाने ही मोहीम राबविली. नगरपालिकेच्या पथकाने नेमून दिलेल्या परिसराला प्रात:काळी भेटी देऊन उघड्यावर शौचविधी करणार्‍या नागरिकांचे प्रबोधन करून शौचालय वापराचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच उघड्यावर शौचविधी न करण्याबाबत प्रबोधन करत आहे. 
 
अवघा महाराष्ट्राला वेड लावणार्‍या 'सैराट' चित्रपटातील संवाद शैलीचा वापर नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय वापराच्या जनजागृतीसाठी केला आहे. फलकांवर आर्चीच्या छायाचित्राचा वापर करतानाच चित्रपटातील तिच्या संवादाचा खुबीने वापर केला आहे. 'एे, खुळ-खुळ्या तुला शौचालयाचा वापर कर' म्हणून मराठीत सांगितल्याचं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू', 'ए रताळ्या, आरं उठ की, तुला कितींदा सांगितलं उघड्यावर बसू नको', असे संवाद डिजिटल फलकांवर टाकल्याने उघड्यावर शौचविधी करणार्‍याना चांगलेच समजावले आहे.