बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (15:10 IST)

एटीएम कार्डाची माहिती देणे पडले महागात

बँकेकडून आल्याचे सांगून एटीएम कार्डधारकांकडून त्याच्या खात्याची माहिती घेत पैसे हडप करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांत बँकेच्या खत्यातून पैसे गाब झाल्याच्या तीन खातेदारांनी कल्याण-डोंबिवली पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. या तिघांना चोरांनी 88 हजार 569 रुपायांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

कंवरलाल सिंग (42) हे कल्याण पश्चिमेत बारावे गावातील नीरज सिटीमध्ये राहतात. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी राहुल शर्मा नावाच एका व्यक्तितीने त्यांना फोन करून आपण बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या बँक खात्याशी संबंधित माहिती जाणून घेतली. त्यानंतर काही वेळातच सिंग यांच्या एसबीआयच्या कल्याण शाखेतून 49 हजार 710 रुपे परस्पर काढले. या प्रकरणी सिंग यांनी ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

दुसर्‍या घटनेत डोंबिवली पश्चिमकडील शिवाजी पार्क सोसायटीच्या गंगा बिल्डिंगमध्ये राहणारे विजय मोरे (57) यांना शुक्रवारी एका व्यक्तितीने फोन करून त्यांच्या क्रेडिट कार्ड व बँक खात्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून 14 हजार 999 रुपे काढण्यात आले. या प्रकरणी मोरे यांनी विष्णू नगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.