गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (10:34 IST)

एफटीआयआयचा प्रश्न लवकरच निकाली

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीने मंगळवारी मुंबईत एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली असून हा प्रश्न लवकरच निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द करावी आणि एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेकरता पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा सोमवारी ११० वा दिवस होता. मंत्रालयाच्या वतीने चचेर्साठी एक पाऊल पुढे टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.

त्यानंतर पहिल्यांदा मुंबईत त्रिसदस्यीय समितीचे सदस्य व विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये काहीशी सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्याने १ आॅक्टोबरला मंत्रालयाची समिती आणि विद्यार्थ्यांत पुन्हा चर्चा होणार असून त्यात हा प्रश्न निकाली लागणार आहे.