बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2017 (00:23 IST)

एमआयएम ठरवणार लातूर महापालिकेचा महापौर - अफजल कुरेशी

लातूर शहर महानगरपालिकेच्या सगळ्या १८ वार्डातील ७० जागा एमआयएम लढणार आहे. या निवडणुकीत दलित, मुस्लीम आणो ओबीसीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत असं अफजल कुरेशी यांनी सांगितलं. कुरेशी यांची नुकतीच लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दलित, मुस्लीम आणि ओबीसींना नेतृत्व मिळायला हवे. येत्या सात तारखेला असदुद्दीन ओवेसी यांची सभा टाऊन हॉलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. दलित, मुस्लीम आणि ओबीसींना मनपात नेतृत्व मिळायला हवे हाच आमचा अजेंडा आहे. लातुरात या समाजाच्या नागरिकांची मोठी संख्या आहे. त्यांना न्याय मिळायला हवा. लातूर मनपात आम्हाला विचारल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा कुरेशी यांनी केला.