मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पुणे , बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (12:30 IST)

एलबीटीप्रश्नी राज्यव्यापी बंद?

एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यास एलबीटीविरोधात एकत्र आलेल्या व्यापारी महासंघाने डिसेंबरअखेर ‘डेडलाईन’ दिली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान सहा महिने तरी एलबीटी रद्द करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आक्रमक झालेल्या व्यापाºयांनी राज्यव्यापी बंद पुकारण्यासाठी पाऊल उचललेले आहे.
 
इतर सर्व कर वसुल केले जात असतानाच एलबीटीही सक्तीने वसुल केला जात असल्याची व्यापाºयांची भावना आहे. त्यामुळे व्यापाºयांनी यास विरोध केला आहेत. जकात, एलबीटी नको शिवाय याला पर्याय म्हणून इतर करही आकारु नये, अशी व्यापाºयांची मागणी आहे. पुणे दौºयावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा प्रश्न मांडून ‘डेडलाईन’ ठेवण्याचा प्रयत्न महासंघाकडून करण्यात आला. मात्र, या प्रयत्नांवर मुख्यमंत्र्यांनी दौºयातील पहिल्याच दिवशी पाणी फेरले आहे.