शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (16:23 IST)

एलबीटीप्रश्नी व्यापारी पुन्हा आक्रमक

एलबीटीप्रश्नी ३१ डिसेंबरपूर्वी योग्य निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा पुणे व्यापारी महासंघाने दिला आहे. त्यामुळे याप्रश्नी व्यापारी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यावर एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन न पाळल्यास आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटी रद्द करू ते एक महिन्यात एलबीटी रद्द करण्यात येईल अशी घोषणाबाजी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे. त्यामुळे एलबीटीप्रश्नी संभ्रमाचे वातावरण आहे.