शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Updated :कोल्हापूर , मंगळवार, 29 जुलै 2014 (11:12 IST)

करवीरनिवासिनीला 35 किलोची शुद्ध सोन्याची पालखी

कोल्हापूरची करवीरनिवासिनी महालक्ष्मीला सोन्याची पालखी अर्पण केली जाणार आहे. यासाठी जवळपास 35 किलो सोने अपेक्षित आहे. दानशूर भाविकांच्या सहकार्याने हे कार्य हाती घेतले जाणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
महालक्ष्मीच्या पुर्नप्रतिष्ठापनेला पुढील वर्षी 300 वर्षे पूर्ण होत आहेत. देवीला सोन्याची पालखी अर्पण करण्याची अनेक दानशूर भाविक इच्छूक आहेत. खासदार महाडिक यांनी या कामात पुढाकार घेतला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे याबाबत स्वतंत्र न्यासाची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.