गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2016 (11:12 IST)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढणार

महाराष्ट्रातील नजीकच्य काळात होत असलेल्या, काळातील नगरपालिका, महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर विचार विनिमय करत कुणासोबत आघाडी करायची याचा निर्णय घेतला जाईल, कॉंग्रेसला सोबत घेऊन लढण्याचा बिर्णय तत्वता झाला आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. 
 
लातूर येथे तटकरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंत्र झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात विभागीय मेळावे घेतले जाणार आहेत. या मेळाव्यांना पदाधिकार्‍यांना निमंत्रित केले जाणार आहे. शक्यतो पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायच्या, जातीयवादी पक्षांना दूर करायचे, 
समविचारी पक्षाशी आघाडी करायची असे ते म्हणाले. छगन भुजबळ राष्ट्रवादीचे फाउंडर अध्यक्ष आहेत. पक्षासाठी आदरणीय आहेत. त्यांची चौकशी सुरु असल्याने अधिक भाष्य करता येणार नाही, राज्यातल्या सरकारला दोन वर्षात काहीच करता आले नाही, कुठलाही निर्णय घेता आला नाही, हे सरकार गोंधळलेले सरकार आहे, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा, मुख्यमंत्र्यांकडून गृहखात्याला न्याय मिळाला नाही, मंत्रीमंडळात कुणीही सक्षम नाही, फडणविसांनी लक्ष घालून प्रश्न निकाली काढावेत असेही तटकरे म्हणाले.