शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (14:42 IST)

कार्टून प्रकरण : उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा तर व्यंगचित्रकाराकडून दिलगिरी

कार्टून प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच तापले असून आता तर   ‘सामना’मध्ये छापलेल्या व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अॅड. विष्णु नवले यांच्या तक्रारीनंतर परभणीच्या नानल पेठ पोलिस ठाण्यात उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 
 
रविवारी वादग्रस्त व्यंगचित्र छापलं होतं. मोर्चांचं विडंबन करणाऱ्या या व्यंगचित्रामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसंच व्यंगचित्रामुळे मराठा समाजातील स्त्रियांची बदनामी झाली आहे. शिवाय हे व्यंगचित्र समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोप तक्रारदार नवले यांनी केला आहे.
 
यावेळी गुन्हा दाखल केलेल्या मध्ये  उद्धव ठाकरेंसह ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, मुद्रक आणि प्रकाशक राजेंद्र भागवत, जिल्हा वितरक यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधान कलम 153 अ, 292, 505, 500 आणि 109 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

प्रभुदेसाईंकडून दिलगिरी 
कार्टूनप्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील ती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून व्यंगचित्र वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.आज हे दिलगिरीचे निर्णय सामनाने पहिल्या पानावर छापल्या आहेत.