मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बंगळुरू , शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (11:40 IST)

कावेरीचे पाणी फक्त पिण्यासाठी

कावेरीच्या चारही जलाशयांमधील पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्यात येईल. अन्य कोणत्याही कारणासाठी त्याचा वापर करता येणार नाही, असा सर्वपक्षीय ठराव कर्नाटकने शुक्रवारी विशेष अधिवेशनात केला. तमिळनाडूला सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर चर्चा करुन ठराव करण्यासाठी कर्नाटक सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन घेतले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यांनी हा ठराव सभागृहात मांडला.