शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पुणे , गुरूवार, 31 जुलै 2014 (17:23 IST)

केंद्राकडून मृत्यांच्या वारसांना दोन लाखाची मदत

जिल्ह्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 28 वर पोहोचला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माळीण गावाची पाहाणी केली. मृत्याच्या वारसांना केंद्राकडून दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. 
 
राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सकाळी माळीण गावाची पाहाणी केली. त्याच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे होते. घटनास्थळाची पाहणी केल्यावर राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दरडीखाली संपूर्ण गाव गाडले गेल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
 
माळीण गावातील घटनेबाबत बुधवारी कळाले. बुधवारी संध्याकाळी येथे येणार होतो. परंतु रात्री येथे अंधार असल्याने आज सकाळी पोहोचले. येथील चित्र फारच विदारक आहे. बुधवारी सकाळपर्यंत इथे घरे होती, मंदिर होते, आता मात्र सगळं गाडले गेले आहे. 44 घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली आहे. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान मदतकार्य करत आहे.