गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 23 जुलै 2014 (11:25 IST)

कोर्टात पोहोचला भीमसेन जोशी यांच्या संपत्तीचा वाद!

भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित दिवंगत पंडीत भीमसेन जोशी यांच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. भीमसेन जोशी यांच्याकडे  10 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यावरून त्यांच्या मुलांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. भीमसेन जोशी यांच्या संपत्तीत जवळपास 20 संगीत कंपन्यांकडून मिळणार्‍या रॉयल्टीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंडीत जोशी यांच्या पहिली पत्नी सुनंदा यांचा मुलगा राघवेंद्र यांनी दाखल केलेल्या खटल्यात हा निर्णय देण्यात आला. राघवेंद्र यांनी जानेवारी 2011 मध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या निधनाच्या काही दिवसानंतर 22 सप्टेंबर 2008 या तारखेला बनवण्यात आलेल्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले होते. 

भीमसेन जोशी यांची संपत्तीवरून त्यांच्या मुलाने मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. पंडीत भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि त्यांच्या तीन मुलांनी पुणे कोर्टाने दिलेल्या निकालाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. पुणे कोर्टाच्या निर्णयात पंडीत जोशी यांच्या पुण्यात असलेला  'कलाश्री' बंगला आणि इतर दोन फ्लॅटमध्ये या तिघांनाही कोण्या तिसर्‍या व्यक्तीला अधिकार देण्यास मनाई करण्यात आली होती.