गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 31 मार्च 2015 (14:41 IST)

खाकी वर्दीला ‘ओव्हरटाइम’चे वेतन

साप्ताहिक सुटीच्या दिवशी कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना एक दिवसाचे वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. या निर्णयाचे राज्यातील पोलिसांनी स्वागत केले आहे.
 
सण, व्ही.आय.पी.चा बंदोबस्त, राजकीय स्तरावरील महत्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटीवेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कमर्चा-यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या जातात. यापोटी त्यांना अत्यल्प भत्ता आतापर्यंत दिला जात होता. आता त्यांना एक दिवसाचे वेतन देण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील २ लाख ६० हजार कर्मचारी, अधिकार्‍यांना होणार आहे.