गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 5 मार्च 2014 (17:34 IST)

गडकरींची ऑफर राज ठाकरे धुडकावणार; लोकसभा लढणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्यात झालेली तब्बल 2 तासांची गुप्त चर्चा वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. गडकरींनी मनसेला दिलेली ऑफर राज ठाकरेंकडून धुडकावण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचेही संकेत दिले असल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहेत.

राज ठाकरे आणि गडकरींमध्ये झालेल्या गुप्त भेटीमुळे महायुतीत चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला युती तोडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मनसेने लोकसभा निवडणूक लढवू नये, असे आवाहन केल्याचे गडकरी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. याशिवाय  राज ठाकरेंनी महायुतीच्या गोटात सामील व्हावे, अशीही गळ गडकरींनी राज ठाकरेंना घातल्याचे बोलले जात आहे.