शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (10:58 IST)

गायकवाडांचे उपोषण अखेर मागे

उपहारगृहासाठी करारवाढ देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर  उचल्याकार  लक्ष्मण गायकवाड यांनी गोरेगावच्या चित्रनगरीतील सुरु केलेले उपोषण मागे घेतले आहे.
 
या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालत गायकवाड यांच्या हॉटेलवरील कारवाईला स्थगिती दिली. शिवाय याविषयीचा संदेश सांस्कृतिक विभागाकडे पाठवून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले.