शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 3 जून 2014 (12:17 IST)

गोपीनाथ मुंडे यांचा संक्षिप्त परिचय

इ.स. १९६९ : बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थीसंसदेच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची(सीआर) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
इ.स. १९७० : परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ. भा. वि. प.) काम
इ.स. १९७८ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव
इ.स. १९७८ : बीड जिल्हापरिषद निवडणुकीत रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी
इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९८० ते इ.स. १९८५)
इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष
इ.स. १९८२ : महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस
इ.स. १९८५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर(गेवराई) मतदारसंघातून पराभव
इ.स. १९८५ : बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत पराभव
इ.स. १९८६ : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष
इ.स. १९८७ : कर्जमुक्ती मोर्चा: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा मोर्चा काढून शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले.
इ.स. १९९० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९० ते इ.स. १९९५) 
इ.स. १९९२, १२ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद. (इ.स. १९९२ ते इ.स. १९९५)
इ.स. १९९२ : संघर्ष मोर्चा: महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली.
इ.स. १९९५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९५ते इ.स. १९९९)
इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे ऊर्जा व गृहखात्यांचे मंत्री म्हणून शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
इ.स. १९९९ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९९ ते इ.स. २००४)
इ.स. २००४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. २००४ ते इ.स. २००९)
इ.स. २००९ : बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले (इ.स. २००९ ते इ.स. २०१४)
इ.स. २००९,११ जूलै : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रभारी म्हणून नेमणूक
इ.स. २००९ : लोकसभेतील भाजपचे उपनेते म्हणून नेमणूक
इ.स. २०१० : जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
इ.स. २०११, १४ मार्च : माफिया राज हटवा मोर्चा: भाजपतर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या माफिया राज हटवा मोर्चा जनजागरण अभियानचे नेतृत्व
इ.स. २०११, ०३ ऑक्टोबर : निर्धार मोर्चा: बीडमध्ये ऊसतोडणी वाढवून मिळवुनसाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला
इ.स. २०११ : जनलोकपाल विधेयकावर अण्णांना पाठिंबा
इ.स. २०१२ : गोवा विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी गोव्यात पाठविले
इ.स. २०१२ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी भाजपतर्फे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे
इ.स. २०१२, २७ जून : संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावर न्यूयॉर्क येथे भारत सरकारचे प्रतिनिधित्व
इ.स. २०१२ : महाराष्ट्राच्या राज्यात दुष्काळी ठिकाणी दौऱ्यावर निघाले.
इ.स. २०१३ : भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीत समावेश
इ.स. २०१४ : खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड.
इ.स. २०१४ : ३ जून २०१४ रोजी नवी दिल्ली येथे रस्ते अपघातात निधन.