मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2015 (15:04 IST)

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज

राज्यात जुल आणि ऑगस्टमध्ये दोन टप्प्यांत होणाऱ्या नऊ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नवी पद्धती राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार शनिवारपासून (४ जुल) उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावे लागणार आहेत. तसेच या निवडणुकांसाठी पहिल्यांदाच निरीक्षकही नियुक्त करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

९ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपासून हे बदल लागू करण्यात येत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.
ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी इच्छुक उमेदवारांना या वेळी प्रथम ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने http://panchayatelection.
maharashtra.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून नामनिर्देशनपत्रे भरावी लागणार आहेत. त्यानंतर ऑनलाइन नामनिर्देशनपत्राची छापील प्रत (प्रिंट्रआऊट) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहीत मुदतीत सादर करावी लागेल. उमेदवारांनी भरलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करेपर्यंत अर्जात दुरुस्त्या करण्याची या प्रक्रियेमध्ये मुभा देण्यात आली आहे.