गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 15 जून 2015 (11:22 IST)

घंटा वाजली; शाळांत किलबिलाट

दोन महिने उन्हाळ्याच्या सुटी धम्माल केल्यानंतर आज सकाळी शाळांची घंटा पुन्हा वाजली आणि युनिफॉर्म घातलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये किलबिलाट सुरु झाला. यावर्षी राज्य सरकार आणि विविध संघटनांकडून मुलांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले.

१५ जून रोजी सर्व शाळा सुरु कराव्यात आणि त्यांच्यासाठी स्वागतोत्सव करण्याचे राज्य सरकारचे नियोजन होते. त्यानुसार आज शाळांमध्ये रांगोळ्या, फुगे, फुलांची आरास आणि विविध संदेश देत, गुलाबाची फुले देत मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांनीही या जोरदार स्वागत वर्षांत शाळांमध्ये प्रवेश केला. या स्वागतोत्सवामुळे मुलांचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता.