गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 8 मे 2015 (12:43 IST)

घुमानमध्ये ‘साहित्य चिंतन’ पाच कोटींचे!

मराठी साहित्याच्या वाटाचालीचा गौरव आणि भावी वाटचालीबाबत चिंतन करण्यासाठी पंजाबमधील घुमानमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५ कोटींहून अधिक खर्च झाल्याची माहिती पुढे आली आहे. आता या खर्चातून सामान्य साहित्यरसिकांना काय मिळणार, असा सवाल पुढे येत आहे.
 
या संमेलनासाठी २ कोटी २९ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती महामंडळाने जाहीर केली आहे.  मात्र, पंजाब सरकारनेही सुमारे तीन कोटींचा खर्च केला आहे.
 
महामंडळाने जाहीर केलेल्या खर्चाच्या हिशोबात दिलेली माहिती अशी -  दोन विशेष रेल्वेसेवा - खर्च ७७ लाख ५३ हजार ४६ रुपये, प्रतिनिधी शुल्कातून जमा झालेली रक्कम ४९ लाख रुपये ग्रंथदिंडी, पुस्तके, निवास व्यवस्था, प्रिंटींग स्टेशनरी आदीसाठीचा खर्च २१ लाख ९३ हजार ५६ रुपये. 
 
व्यासपीठाच्या सजावटीसाठी १३ लाख ४१ हजार ३२२ रुपये, मनोरंजनाकरिता ६ लाख २३ हजार रुपये तसेच वाहतुकीसाठी ९ लाख १७ हजार ६५९ रुपये .