शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

चव्हाणांविरोधात भाजप निवडणूक आयोगाकडे

ND
ND
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक खर्चाबाबत चव्हाण यांनी आयोगाला खोटी माहिती दिली असून, त्यांनी निवडणूकीत केलेला खर्च आणि दाखवलेला खर्च यात मोठा फरक असल्याचे भाजपनी म्हटले आहे.

भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे एक पथक सोमवारी निवडणूक आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे चव्हाण यांची तक्रार करणार आहेत.