शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: ठाणे , सोमवार, 14 मार्च 2016 (09:53 IST)

चारही नगरसेवकांचं पद रद्द

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी नगरसेवकांची अपात्रतेची कारवाई सुरु झाली आहे. महापालिकेनं या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.
 
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी 7 ऑक्टोबर 2015 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या चारही नगरसेवकांवर आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे,  काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण या चार नगरसेवकांची नावे परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत होती. या चारही नगरसेवकांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला होता.
 
त्यामुळे या चौघांना अटकपूर्व जामीन अर्ज मागे घ्यावा लागला. त्यानंतर या नगरसेवकांनी डिसेंबर 2015 मध्ये शरणागती पत्करण्यासाठी न्यायालयाकडे अवधी देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य करत या चौघांना सकाळी 9 वाजता ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या नगरसेवकांनी शरणागती पत्करली.