शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (10:43 IST)

चौकशीमुळे आता अजित पवार अडचणीत?

कथीत गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला असतानाच आता राज्यातील सिंचन प्रकल्पाची चौकशीची प्रक्रिया सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यामुळे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
४८ लघुसिंचन प्रकल्पांचा फेरआढावा घेण्यासाठी आणि त्यातील दोन लघुसिंचन प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना आज जलसंपदा विभागाने केली. यापैकी बहुतेक प्रकल्पांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा मंत्री असतानाच्या काळात मान्यता देण्यात आली होती.
 
त्यामुळे शासनाने पवार यांच्या कार्यकाळातील कथित सिंचन घोटाळ्यांची चौकशी सुरु झाल्याची चर्चा आहे. हे प्रकल्प १० ते १२ कोटी रुपयांदरम्यानच आहे. जलविद्युत प्रकल्प; पुणे येथील मुख्य अभियंता रा.वा. पानसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत औरंगाबादच्या महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्राचे मुख्य अभियंता अ.सु. ननवरे, जलसंपदा विभाग; कोकणचे मुख्य अभियंता खलिल अन्सारी आणि अधीक्षक अभियंता च.ना. माळी हे सदस्य असतील.