गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 20 डिसेंबर 2014 (15:36 IST)

जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

जयंत नारळीकर यांना ‘चार नगरातले माझे विश्व’या आत्मकथनात्मक पुस्तकासाठी तर माधवी सरदेसाई यांना कोकणी भाषेतील ‘मंथन’या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्कार जाहीर झाला आहे.

 पुरस्काराचे इतर मानकरी-  आसामी-अरूपा पतंगिया कलिटा (मरियम अस्टिन अथाबा हिरा बारुआ), बंगाली- उत्पलकुमार बासू (पिया माना भाबे), बोडो-उरखाओ ग्वरा ब्रह्मा (उदग्नीफ्राय गिदिंगफिनाय), डोगरी- शैलेंद्र सिंग (हाशिये पार), गुजराती- कै. अश्विन मेहता (छबी भितरनी), इंग्रजी- अदिल जुस्सावाला (ट्रायिंग टू से गुडबाय), हिंदी- रमेशचंद्र शहा (विनायक), कन्नड- जी. एच. नायक (उत्तरार्ध), काश्मिरी- शद रमझान (कोरे ककुड पुशरिथ गोमे), मैथिली- आशा मिश्रा (उचट), मल्याळाम- शुभाष चंद्रन (मनुष्यानू ओरू आमुखम), नेपाळी - नंद हंखिम (सत्ताग्रहण), उडिया- गोपाळकृष्ण रथ (बिपुला डिगांथा), पंजाबी- जसविंदर (अगरबत्ती), राजस्थानी- रामपाल सिंग राजपुरोहित (सुंदर नैन सुधा), संथाली- जमदर किस्कु (माला मुदाम), सिंधी- गोपी कमल (सिजा अज्ञान बुकु), तमिळ- पुमानी (अंगनगदी),तेलगु- रचपालेम चंद्रशेखर रेड्डी (मना नवलालू- मना कथनीकालू) आणि ऊर्दू- मुन्नवर राणा (शहदाबा).