शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

झाकीर नाईकला मिळाले विदेशातून 60 कोटी

मुंबई- इस्लामिक रिसर्च फाउंडेशन संस्थेचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये गेल्या तीन वर्षात 60 कोटी रूपये जमा झाले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही रक्कम तीन वेगवेगळ्या देशातून जमा करण्यात आली असून या पैशांचा वापर कशासाठी करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.
 
बांगलादेशची राजधानी ढाक्यात हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांनी झाकीर नाईक यांच्या भाषणांमधून प्रेरणा घेतली होती, अशी माहिती पुढे आल्यानंतर नाईक गोत्यात आले आहेत. नाईक यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. नाईक स्वत:हून भारतात न आल्यास त्यांच्या हस्तांतरणासाठी प्रयत्न केले जातील, असेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे.