गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 20 फेब्रुवारी 2016 (14:55 IST)

ट्रक दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

भीमाशंकरहून दर्शन घेऊन परतताना तळेघर-मंदोशी घाटात वारकरी असलेला ट्रक दरीत कोसळला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृत लातूर जिल्ह्यातील रेणापूर गावातील आहेत.

 भीमाशंकरहून दर्शन घेऊन वारकरी या ट्रकने मंचरकडे निघाले होते. मंदोशी घाटात ट्रक आल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक घाटात कोसळला. जखमींवर घोडेगाव रुग्णालयात तर काहींवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.