बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

डॉ. अनिल काकोडकर यांना महाराष्ट्रभूषण

WD
ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मभूषण आणि अणुऊर्जा आयोगाजे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना 2011-12 या वर्षासाठीचा अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार काल जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

यापूर्वी पु.ल. देशपांडे, गानसाम्राज्ञी लता मंगेशकर, सुनिल गावस्कर, डॉ. विजय भटकर, सचिन तेंडुलकर, पं. भीमसेन जोशी, डॉ. अभय बंग व राणी बंग, बाबा आमटे, रघुनाथ माशेलकर, रतना टाटा, रा. कृ. पाटील, मंगेश पाडगांवकर, नानासाहेब धर्माधिकारी, श्रीमती सुलोचना दीदी, डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.