शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 2 जुलै 2015 (10:24 IST)

....तर राजीनामा देईन : पंकजा मुंडे

मी एक रुपयाचाही अपहार केलेला नाही. उलट केंद्र सरकारकडून आलेला अतिरिक्त निधी वाया जाऊ नये, या प्रामाणिक भावनेतूनच मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या चिक्की व इतर साहित्य खरेदीची तातडीने खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

लंडनमधून परतल्यावर त्यांनी मुंबईत तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे खंडन केले. त्या म्हणाल्या, केंद्र शासनाने पोषण आहारासाठीच्या रकमेत जी एक रुपयाची वाढ केली, त्यातून मिळालेल्या अतिरिक्त रकमेपैकी ४२ कोटी रुपये लाभार्थ्यांना अंडी व केळी देण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे सोपविण्याचा निर्णय आम्ही घेतला. चौकशीला सामोरे जाण्यास तयार असून, गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाल्यास सर्व पदांचा राजीनामा देऊ.