गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2015 (10:16 IST)

त्र्यंबकेश्वला आज तिसरे शाही स्नान

नाशिक- नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर येथे आज तिसरे व शेवटचे शाही स्नान होणार आहे, असे नाशिक जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हजारो भाविक महंत व विविध आखाड्यांचे साधू हे कुशावर्त तीर्थ येथे पहाटे सव्वा चारपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शाही स्नान करतील, असे सांगण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस सर्वत्र तैनात केले आहेत.